⚡कुडाळ, ता.२५-:
श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. शांताराम भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परिट समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर, कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळाचे खजिनदार श्री. नंदकुमार राठे, महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. दीपली भालेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात एकूण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जि.प. सदस्य श्री. दीपक नारकर, पं.स. सदस्य श्री. बंडू चव्हाण, नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण सभापती यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सदानंद आंगणकर, श्री. विजय आजगावकर, श्री. प्रदीप नारकर, श्री. अनिल शिंदेवकर, श्री. बबन कवळेकर, श्री. मुकेश नारकर तसेच महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. प्रदीप नारकर यांनी केले.
