दोडामार्ग,
:- कोकणातील जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांवरील वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हळबे महाविद्यालय, इकोनेट पुणे, IISA महाराष्ट्र, वनश्री फाउंडेशन आणि विवेकानंद पर्यावरण अवेअरनेस ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत असून मानव–वन्यजीव संघर्ष, जैवविविधता संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि धोरणात्मक पर्याय या विषयांवर चर्चा होणार आहे.
मिलिंद कारखानीस, गौरी भोपटकर, डॉ. अनंत कदम, डॉ. गौरव राऊत, राजेंद्र केरकर यांसह विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून पर्यावरण अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दोडामार्गात जल, जंगल, जमीन विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र…
