शिवडाव ओटोसवाडी येथील श्री देव भूतनाथाचा २७ पासून अखंड हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.२५-: शिवडाव ओटोसवाडी येथील श्री देव भूतनाथ यांचा अखंड हरिनाम सप्ताह २७ व २८ फेब्रुवारी रोजी मांडकार देवालय येथे आयोजित करण्यात आला आहे.यानिमित विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर अखंड नामस्मरण तसेच सुस्वर भजने होणार आहेत. २८फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. नवस बोलणे,फेडणे ,तीर्थप्रसाद या कार्यक्रमानंतर रात्री ८ वाजता भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवडाव, ओटोसवाडी भूतनाथ बालगोपाळ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page