मालवण तालुक्याचा खंडित वीज पुरवठा येत्या दोन दिवसात पूर्ववत करण्यात येईल…

आमदार वैभव नाईक यांची माहिती

*💫मालवण दि.१८-:* तौक्ते चक्रावादळाचा जबरदस्त तडाखा बसलेला मालवण तालुका वादळाच्या तडाख्यातून काहीसा सावरु लागला असून खंडित झालेला वीज पुरवठा येत्या दोन दिवसात पूर्ववत करण्यात येईल असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. लोकांनी नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत व दुरुस्तीची कामे सुरू करावीत. पंचनाम्यासाठी नुकसानीचे फोटो ग्राह्य धरले जातील असे आम. नाईक यांनी सांगितले. दांडी येथील संदीप मालाडकर यांच्या घराची कौले व पत्रे तुटून नुकसान झाले, धुरीवाडा येथील बाळकृष्ण मयेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले, धुरीवाडा येथील प्रशांत कांदळकर यांच्या घरावर झाडाची फांदी पडून छपराचे नुकसान झाले तर माड कोसळून नुकसान झाले, मेढा येथील उदय रासम यांच्या घरावर झाड कोसळले, वायरी येथील जान्हवी मयेकर यांच्या दुकानावर आंब्याचे झाड पडले, वसंत परुळेकर यांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले, देऊळवाडा पेट्रोल पंप येथील जगदीश सामंत यांचा शेत मांगर कोसळला तर आंबा कलम पोफळी व केळीची झाडे पडून नुकसान झाले, वायरी येथील संतोष चव्हाण यांच्या घरावर तसेच शेडवर झाड कोसळले, भरड नाका येथे ललित मेस्त्री यांच्या शौचालयाचे झाड पडून नुकसान झाले, कुंभारमाठ येथे योगेश दिंडे यांच्या घराची कौले उडून गेली, देवबाग येथे लक्ष्मीकांत साळगावकर यांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले, रेवतळे येतील जयप्रकाश देसाई यांचा माड कोसळला, देवबाग येथे विलीमा डिसोझा यांचे कंपाउंड वॉल पत्रे व तंबू समुद्राच्या लाटांच्या माऱ्यात वाहून गेले, वायरी गद्रेरोड येथे जयमाला मयेकर यांच्या गाईच्या गोठ्याचे पत्रे उडाले गवत भिजले व दोन माड कोसळून नुकसान झाले, धुरीवाडा येथे दिनकर मयेकर यांच्या मांगरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले, मेढा येथील संदीप शिरोडकर यांच्या घरावर झाड कोसळले, देऊळवाडा येथील मंदाकिनी पराडकर यांची घराची कौले फुटली व पत्रे उडाले, मेढा येथील विश्वास पराडकर यांच्या घराची कौले फुटली तर वसंत शिरोडकर यांच्या घरावर माड पडला, देऊळवाडा येथील दीपक मराळ यांचे माड पडून नुकसान झाले, कचेरी रोड येथील दिलीप पाटकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडले, धुरीवाडा येथील अमूल केरकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडले, वायरी येथील सायली गाड यांच्या मंगल कार्यालयावर झाड कोसळले तर घराचे पत्रे उडाले, मशीद गल्ली येथील शोभा धावडे यांच्या घरावर झाड कोसळले, मेढा येथील अनुराधा नागवेकर यांचे आंब्याचे झाड पडून नुकसान झाले, तोंडवळी वरची येथील भगवान मुंज यांच्या रेशनधान्य दुकानावर आंब्याचे झाड पडले, राजकोट येथील नंदन देसाई यांच्या घराची कौले व पत्रे उडाले, मेढा येथील रघुनाथ केळुसकर यांच्या घरावर झाड पडले, रॉक गार्डन येथील गौरव कांबळी यांच्या स्नॅक्स कॉर्नर स्टॉलचे पत्रे उडाले, राजकोट येथील सदानंद भोगवेकर यांच्या घरावर चिंचेचे झाड पडले, बाजारपेठ येथील मुजावर शेख यांच्या करप्पूस्वामी यांच्या दुकानाची कौले उडाली

You cannot copy content of this page