शहरात आज एकही रुग्ण नाही*
सावंतवाडी-: अनेक दिवसानंतर आज सावंतवाडी शहराने सुटकेचा श्वास घेतला असून, आज शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून न आल्याने सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु ग्रामीण भागात २४ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कुंभवडे १, गुळदुवे १, आंबोली १, मळगाव १, कोनापाल १, निरवडे १, सातार्ड १, आजगाव ३, आजगाव भोम १, आरोस १, मळेवाड १, आरोंदा १, न्हावेली १, पाडलोस १, चौकुळ १, माडखोल ४, मडूरा १, सातोसे १, तळवडे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६५८ रुग्ण सक्रिय आहेत.
