Headlines

आरोस दांडेली येथील युवा व्यावसायिकांना तौक्ते चक्रीवादळाचा फटक…

सर्व्हिसिंग सेंटर व गॅरेजचे वादळाच्या तडाख्याने नुकसान_

*💫सावंतवाडी दि.१८-:* तौक्ते चक्री वादळासोबत कोसळलेल्या पावसामुळे आरोस दांडेली येथील मंदार मुळीक यांच्या सर्व्हिसिंग सेंटर व राजन सावंत यांच्या गॅरेजचे या वादळाच्या तडाख्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाच संकट त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय, उद्योग धंदे बंद असून आता परत चक्री वादळाच संकट या चक्रीवादळ व पावसामुळे दांडेली येथील बऱ्याच जणाचे नुकसान झाले आहे. त्यात दांडेली येथील मंदार मुळीक यांचे गोविंदराज सर्व्हिसिंग सेंटर व राजन सावंत यांचं ऐरावत इंजीनिअरींग वर्क हे लोखंडी असलेले छप्पर गॅरेज या वादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाले आहे. यात दुरुस्तीसाठी असलेल्या चार चाकी गाड्यांचे पण नुकसान झाले आहे. तसेच मंदार मुळीक यांच्या घराची कौले उडून गेली त्यामुळे त्यांचे घर व गॅरेजचे जवळ जवळ दोन लाख पाच हजाराचे नुकसान झाल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यावर ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीची दाखल घेऊन लवकरात लवकर त्यांना व इतर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

You cannot copy content of this page