झाडे कोसळल्याने बांदा शिरोडा मार्ग ठप्प_
*💫बांदा दि.१६-:* अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टाने निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मडुरा पंचक्रोशीतील गावांना मोठा फटका बसला. घरे, शेती पंपाची शेडवर झाड कोसळले. तर आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम आदी झाडे उन्मळून पडली. महावितरणचे विद्युत खांब कोसळून मडुरा पंचक्रोशीत एकंदरीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. तसेच बांदा शिरोडा मार्गावर झाडे पडल्याने सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत मार्ग वाहतुकीस बंद होता. ग्रामस्थांनी मदतकार्यात हातभार लावला. रविवारी पहाटेपासूनच आगमन झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या भीतीने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. वीजपुरवठा ठप्प! चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री 9.30 वाजता खंडित करण्यात आलेला विद्युतपुरवठा रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत बंदच होता. सर्वात जास्त नुकसान वीज वितरणचे झाले.
