शहरात ९ तर ग्रामीणात ७
*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १६ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
तालुक्यात मिळालेल्या 16 रुग्णांनपैकी शहरात चितारआळी 1, सालईवाडा 3, सबनीसवाडा 2, बिरोडकरटेंब 2, सावंतवाडी 1 असे 9 रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात कोलगाव 1 माजगाव 2 चराठ 1, ओटवणे 1, कुणकेरी 1, नेमळे1 असे 7 रुग्ण आढळते आहेत. तर नेमळे येथील एकाच कॉरोनामुळे मृत्यू झाला आहे. साध्य 754 रुग्ण सक्रिय आहेत.
