सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांची प्रमुख उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.१२-: वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात सक्रीय सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान सौ. वेदिका परब यांनी स्थानिक नागरिकांशी आणि महिलांशी सविस्तर सुसंवाद साधला. सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची तळमळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असलेली जाण यावेळी प्रकर्षाने दिसून आली. महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती आणि समाजकार्य यांची सांगड घातल्याबद्दल त्यांनी वेताळ प्रतिष्ठानचे आभार मानले.
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने मा. दादासाहेब परुळेकर ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक तज्ञ,डॉ. धनराज गोस्वामी प्राचार्य, बॅ. खर्डेकर महाविद्यालय,मा. पुष्कराज कोल्हे माजी CEO जिंदाल उद्योग समूह,मा. दयानंद कुबल अध्यक्ष कोकण एनजीओ,मा. रश्मी परब सरपंच तुळस गाव, यासोबतच उपसरपंच सचिन नाईक, भाजप तालुका महिला अध्यक्ष सुजाता पडवळ, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागवेकर यांच्यासह वेताळ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तुळस गावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना आणि उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. भाजप आणि वेदिका परब यांच्या जनसंपर्कामुळे या महोत्सवाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
