वीर जवान दौड’ मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद…

सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१२-: सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वीर जवान दौड’ मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना समर्पित असलेली ही मॅरेथॉन आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आदी विविध भागांतून ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर सैनिक स्कूलचा सिनियर कॅडेट अथर्व पालव याने शाळेच्यावतीने सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक मनोज देसाई यांनी स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन केले.
ही मॅरेथॉन १०, १४, १७ वर्षांखालील मुले-मुली तसेच महिला व पुरुष खुला गट अशा एकूण सात गटांत घेण्यात आली. विविध गटांतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, कर्नल विजयकुमार सावंत, सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डोन्टस, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, नगरसेविका दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, डॉ. स्नेहल गोवेकर, कॅथलिक पतसंस्थेच्या संचालिका डिसोजा मॅडम, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे, निवृत्त प्राचार्य सुरेश गावडे, क्रीडा शिक्षक शैलेश नाईक, सैनिक पतसंस्था उपमहाव्यवस्थापक प्रल्हाद तावडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशनचे सदस्य तसेच क्रीडारसिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन एस. के. गावडे व क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांनी केले. आर्या क्लिनिक सावंतवाडीच्या डॉ. सुनिता म्हाडगूत तसेच भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज यांनी वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१० वर्षांखालील मुले :
प्रथम – स्वराज संदीप सावंत
द्वितीय – सर्वेश संतोष कापडी
तृतीय – निर्मय संतोष रेडकर

१० वर्षांखालील मुली :

प्रथम – हिंदवी जयराम दळवी
द्वितीय – स्पृहा भूषण नार्वेकर
तृतीय – काव्या अर्जुन राऊळ

१४ वर्षांखालील मुली :
प्रथम – अनन्या दीपक कुंभार
द्वितीय – आस्था अमित लिंगवत
तृतीय – श्रावणी भिवा महाडेश्वर

१४ वर्षांखालील मुले :
प्रथम – वेदांत युवराज पाटील
द्वितीय – भावेश संतोष यादव
तृतीय – वेदांत विनायक भोपळे

१७ वर्षांखालील मुले :
प्रथम – जयेद समीर शेख
द्वितीय – सुनील बाबुराव जंगले
तृतीय – यश प्रकाश कडव

महिला खुला गट :
प्रथम – मेघा प्रमोद सातपुते
द्वितीय – रेश्मा रावबा पांढरे
तृतीय – तेजस्वी भरत गावडे

पुरुष खुला गट :
प्रथम – ओमकार विष्णू बैकर
द्वितीय – आदित्य आनंद राऊळ
तृतीय – ओम उन्हाळकर

You cannot copy content of this page