रोणापाल येथे काजू बागेला भीषण आग…

आगीमध्ये दोन ते तीन लाखांचे नुकसान..

⚡बांदा ता.०९-: रोणापाल पुरण येथील मोहर आलेल्या काजू बागायतीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.सदर काजू बागायती सात वर्षं झाली होती व आताच ती उपन्न देणारी होती. एकूण शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमध्ये अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे, तानाजी महादेव गावडे, यांच्या काजू बागायती जळून खाक झाली आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशामन बंब मागवण्यात आला होता. परंतु स्थानिक ग्रामस्थ बाबल परब,प्रदिप नाईक, संदेश केणी,सुधीर गावडे,मंगेश गावडे, बाबल तुर्येकर, अशोक कुबल यांनी आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यावेळी रोणापाल पोलीस पाटील निरजा परब यांनी सुद्धा सहकार्य केले. आग लागून नुकसान झाल्याची कल्पना कृषी व महसूल विभाग यांना देण्यात आली आहे. सदरील नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे अन्यत आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page