प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब: तर मलाच या अभियानाची कल्पना नाही, मुख्याधिकाऱ्यांचा स्पष्टीकरण..
⚡सावंतवाडी ता.०९-: येथील नगरपरिषद प्रशासनाकडून सावंतवाडी बस स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याने आक्रमक झालेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकानी गटनेते बाबू कडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराव घालत जाब विचारला सत्ताधाऱ्यांकडून जाणून-बोलून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही खपवून घेणार नाही अशा इशारा दिला. मात्र मुख्याधिकारी यांनी मलाच यासंदर्भात कोणी कल्पना दिली नाही असे सांगून यापुढे असे होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल असे स्पष्ठ केले.
सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेमध्ये सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष याशिवाय काँग्रेस आणि उबाठाचे नगरसेवकही सहभागी झाले होते परंतु शिंदे शिवसेनेच्या सातही नगरसेवकांना या स्वच्छते मोहिमे संदर्भात कोणतीही कल्पना किंवा नोटीस नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती यासंदर्भात आक्रमक झालेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेमध्ये धडक दिली यावेळी प्रभारी मुख्याधिकारी श्री औंधकर यांना जा विचारला परंतु मुख्याधिकारी यांनी आपल्यालाच या संदर्भात रात्री उशिरा कल्पना देण्यात आली. सदरचा कार्यक्रम हा प्रशासनाकडून राबवत असताना सर्व नगरसेवकांना कल्पना देणे गरजेचे होते परंतु अधिकाऱ्यांनी असे करणे चुकीचे आहे असे सांगत स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांना बोलावून घेत चांगलेच झापले.
यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका अँड सायली दुभाषी, नगरसेविका स्नेहा नाईक उपस्थित होते.
