नेमळेत पाईपलाईनचे काम करताना कामगार ठार

नेमळेतील दुर्घटना ; क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने अपघात

सावंतवाडी – नेमळे येथे पाईपलाईन चे काम करत असताना घडलेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला आहे. विशाल सुरेंद्र शर्मा असे त्या इस्माचे नाव असून तो मूळचा बिहार चा रहिवासी असून, सद्य स्थितीत तो सावंतवाडी तालुक्यात राहत होता. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कामगार हा पाईप लाईनचे काम सुरू असताना त्या ठिकाणी उभा होता. यावेळी अचानक तेचा तोल जाऊन खाली पडला असता त्याचवेळी तेथे काम करणाऱ्या क्रेन चे चाक अंगावरून गेले. यावेळी त्याला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद गणेश कुमार या व्यक्तीने पोलिस स्थानकात दिली आहे.

You cannot copy content of this page