सानिकाचे यश:एक रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई..
⚡सावंतवाडी ता.०६-: विरार-मुंबई येथे पार पडलेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट् कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत मळगाव येथील मधुरा रत्नाकर मांजरेकर हिने रौप्य व कांस्य पदक तर सानिका संजय गोसावी हिने दोन कांस्य पदके पटकावत मळगावसह तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
विरार येथील निसर्गरम्य अर्नाळा बीचवर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विविध कराटे अकॅडमींचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत मधुरा व सानिका यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. मधुरा व सानिका सावंतवाडी येथील आरपीडी महाविद्यालयात ११ वी कला शाखेत शिकत असून मळगाव येथे कराटेच प्रशिक्षण घेत आहेत. या दोघींना कराटेचे प्रशिक्षक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेल्फ डिफेन्सचे संचालक किरण देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सुवर्ण यशामुळे दोघींचीही दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामुळे मळगाव परिसरातून दोघींवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
