आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांची पुन्हा नियुक्ती करा…

ग्रामस्थांची ठाम मागणी:जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देणार..

⚡आंबोली,ता.६-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांनाच पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.त्यांची या ठिकाणी सेवा चांगली असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना या ठिकाणी पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.आदिती पाटकर यांची बदली करण्यात आली आहे.

तर अजून डॉ.जाधव यांना दुसरीकडे नियुक्ती देण्यात आलेली नाही.या ठिकाणी दोन नवीन डॉक्टर रुजू करण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉ.महेश जाधव यांचे काम आणि सेवा चांगली आहे.त्यामुळे शासनाने त्यांना या ठिकाणी पुन्हा नियुक्ती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.यावेळी ग्रामस्थ सत्यवान गावडे,अनिल चव्हाण, काशीराम राऊत, बुधाजी पाताडे, बबन गावडे,प्रवीण राऊत,उदय आंबोलकर,नारायण कोरगावकर,सुशील तावडे,प्रथमेश गवंडे, दादा नाटलेकर,उत्तम पारधी,महेश कोकरे,सुनील जाधव,अजय मसुरकर,प्रकाश मसुरकर,स्वप्नील भिसे,संजय राऊत,अमित गुरव,रमेश मोहिते,झिपा सावंत आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page