कणकवलीत केले शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घेतली भेट..
⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यानिमित कणकवली रेल्वे स्टेशनवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे आगमन होताच शिंदे शिवसेनेच्या वतीने माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शिंदे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख दामू सावंत, प्रथमेश तेली, उमेश वाळके, प्रिया टेमकर, सत्यवान राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान राम शिंदे हे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
