पालकरवाडी वेतोरे ग्रा.पं. उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड

⚡वेंगुर्ला ता.०५-: तालुक्यातील पालकरवाडी वेतोरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा समिर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवारी दि. 5 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील व अध्यासी अधिकारी व्ही. जी. सावंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
उपसरपंच नंदिता शेर्लेकर यांनी 24 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर आज रिक्त जागेसाठी ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी ग्रा. पं. सदस्य आबा कापडी, दिनकर पालव, नंदिता शेर्लेकर, विकास अणसुरकर, उमा करंगुटकर, संगिता परब, सौ. पालकर, दिपक मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी निवड जाहीर झाल्यानंतर सूर्याजी नाईक, पोलीसपाटील समिर गोसावी, नारायण शेर्लेकर, दिपक करंगुटकर, ज्ञानदेव लटम, भाऊ गावडे, बाळा गावडे, सुधीर गावडे, आबा येरम, सुदेश गोसावी आदी ग्रामस्थांनी सौ. गोसावी यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page