⚡सावंतवाडी ता.०५-: संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संदिप गावडे यांच्याहस्ते तळवडे सिद्धेश्वर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला कुंभार समाजबांधव मोठ्याप्रमाणत उपस्थित होते. यावेळी कुंभार समाजाचे शासकीय स्तरावर कोणतेही काम असल्यास त्याला माझे कायम सहकार्य असेल असेही श्री गावडे म्हणाले.
यावेळी कुंभार समाज प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदूलकर, विलास गुडेकर, नारायण साळवी,तसेच कुंभार समाजाचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख व समाजबांधव उपस्थित होते.
