चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास कणकवली पोलीस सज्ज

रंगीत तालीमही आली घेण्यात

कणकवली : पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली तौत्की वादळाच्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कणकवली पोलिस सज्ज झाले आहेत. कणकवली पोलिसांनी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कसून तयारी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी कणकवली वरवडे येथील नदीपात्रात जेमिनी क्राफ्ट बोटीसह बचावकार्याची रंगीत तालीम घेतली .या रंगीत तालीमेत कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले. कणकवली पोलिस या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.

You cannot copy content of this page