वन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज
*💫आंबोली दि.१५-:* येथील घाटात गेले वर्षभर कोणतेही काम झालेले नाही.धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा असे आदेश पालकमंत्र्यांनी देवून देखील कोणतीही कृती वनविभागाकडून झाली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कोणतेही काम वर्षभर केले नसल्याने पावसाळ्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबोली घाटात पवसाळ्या पूर्वी बांधकाम विभाग घाटातील वरच्या गटार साफ करते. रस्त्याच्या बाजूच्या गटार मोरी साफ केली जाते. साईडपट्टी केली जाते.यावर्षी संबंधित शाखा अधिकारी फिरकला देखील नाही.गेल्यावर्षी पावसाळ्यात किरकोळ माती आली तरी ५ दिवस घालवले आहेत.त्यामुळे त्याच्या कामाबाबत संताप वेकत होत आहे.केवळ रस्त्याची,खड्डे भरण्याची किंवा मोरी बांधकाम ची मलिद्याची कामे असली तेव्हाच अधिकारी एखाद्या वेळी फिरतात. एरवी त्यांचा पत्ता नसतो. वनखात्याचे देखील तसेच आहे. पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही झाडे तोडली नाहीत.हा मुद्दा या पूर्वी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी सर्वसाधारण सभेत मांडला होता.त्यावेळी ठराव घेण्यात आला होता.तसे आदेश जिल्हा परिषद कडूनही देण्यात आले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवा म्हणून सर्वाची तयारी असते.मात्र दोन्ही विभाग सुंब दिसत आहेत. मैलकुली नाही असे कारण सांगितले जाते मात्र भरती करताना बाहेरच्या जिल्ह्यातील उच्च शिक्षित घेवून प्रत्यक्ष कामावर एकही आला नाही.स्थानिकांना एकालाही घेतले नाही.स्थानिक मैलकुलि निवृत्त झाल्यानंतर भरती करताना ही चूक बांधकाम विभागाने केली.त्यामुळे ही समस्या आहे.तातडीने या सगळ्याची रस्ता सुरक्षा वेवस्था दोन्ही विभागाने करणे आवश्यक आहे.अशी मागणी आंबोली ग्रामस्थांची आहे.
