आधार फाउंडेशनच्या नंदन वेंगुर्लेकर यांची मागणी
*💫वेंगुर्ले दि.१५-:* दुसऱ्या लाटेतील कोरोनाला आटोक्यात आणणे अद्यापही शक्य होत नाही आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असतानाच त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या सोयीसाठी प्रशासनाने “बेड वॉर रूम” सुरु करावेत अशी मागणी आधार फाउंडेशन चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केली आहे. सिंधुदुर्गात कोरोना वर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत पण ते अपुरे आहेत. त्यातच ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड अभावी मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ऑक्सिजन बेड अथवा व्हॅटिलेटर बेड कुठे आणि किती उपलब्ध आहेत याविषयी सहज आणि पक्की माहिती मिळताना अडचणी येतात. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर महानगरपालिकेने war room kmc फोन 912312542601 / 0231254473 आणि war room सीपीआर फोन 86609052600 सुरू केला आहे. या वॉर रूम मुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रेग्युलर बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड किती उपलब्ध आहेत याची तात्काळ माहिती मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासनाने अशी वॉर रूम सुरू करावी सुरू अशी मागणी आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केली आहे. या वॉर रूम मुळे भविष्यात अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो ही भावना अधिकाऱ्यांमध्ये कधी येणार याचे उत्तर अजूनही मिळत नसल्याची खंत आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केली आहे.
