माजगावच्या विकास कामांमध्ये बाहेरच्यांनी लुडबुड करू नये…

सरपंच व सदस्यांचा इशारा: ग्रामस्थांशी आम्ही चर्चा करूनच हा प्रकल्प योग्य रीतीने मार्गी लावू..

⚡सावंतवाडी ता.३१-:
माजगाव येथे शासनस्तरावर मंजूर असलेला घनकचरा व्यवस्थापन (कचरा डेपो) प्रकल्प माजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रस्तावित असून, सुरुवातीला हा प्रकल्प हेळेकर कुंभारवाडा स्मशानभूमी परिसरात राबवण्याचा प्रस्ताव होता. मात्र या जागेबाबत ग्रामस्थांमध्ये असलेल्या विविध शंका व सूचनांचा विचार करता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून सदर प्रकल्प अन्य योग्य ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान या विषयात इतर गावांतील पदाधिकाऱ्यांनी किंवा व्यक्तींनी ढवळाढवळ करू नये. माजगावच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. माजगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ स्वतः सक्षम असून, योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहेत, अशी ठाम भूमिका यावेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मांडली आहे.

या बैठकीस सरपंच श्री. रिचर्ड डिमेलो, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री. संतोष वेजरे तसेच श्री. शाम कासार माजी उपसभापती श्री. चंद्रकांत कासार, माजी सरपंच खेमा हरमलकर, श्री. दिनेश सावंत, माजी सदस्य राजन पाटकर, सामाजिक कार्यकर्ते रुपेश नाटेकर, श्री. संजय माजगावकर, श्री. रामदास भोगण, श्री. सिताराम बांदेकर, श्री. बापू तळवडेकर, श्री. धोंडू भोगण, श्री. विजेंद्र मांजरेकर, श्री. जयेश पावसकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page