स्पर्धेत रोहन , ऋतुजा , नारायण प्रथम:स्पर्धकांनी एका पेक्षा एक अशी कला सादर करत स्पर्धेचा उत्साह वाढविला..
⚡सावंतवाडी ता.३०-: नव तरुण हौशी कलाकार ग्रुप व जगदगुरू नरेंद्राचार्यजी संगीत आराधना तिरोडा शाखा आयोजित गायन व वादन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभला. एकापेक्षा एक सरस अशी प्रत्येक स्पर्धकांनी आपली कला सादर केली.
स्पर्धेचा शुभारंभ श्वेतादेवी खासे – भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी तिरोडा सरपंच माधुरी पटेकर, शास्त्रीय गायक व परीक्षक श्रीराम दीक्षित, श्री देवी माऊली देवस्थान कमिटी तिरोडा अध्यक्ष लक्ष्मण साळगांवकर, माजी सैनिक बाळकृष्ण शेणई ,पोलीस पाटील तिरोडा लवू रगजी, श्री नरेंद्र माऊली प्रासादिक भजन मंडळ रेडी बुवा संदेश आसोलकर , नवतरुण हौशी कलाकार गृप तिरोडा – भरडवाडी अध्यक्ष शंकर साटेलकर,केशव पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक 🙁 मोठा गट हार्मोनियम वादन व गायन)- प्रथम क्रमांक रोहन सावंत, द्वितीय क्रमांक अरुण गवंडी, तृतीय क्रमांक जयराम बागकर (तिरोडा), उत्तेजनार्थ प्रियांका परब
(लहान गट:- हार्मोनियम वादन व गायन (प्रथम क्रमांक ऋतुजा शेणई (तिरोडा), द्वितीय क्रमांक रिया साटेलकर (तिरोडा), तृतीय क्रमांक नमिता शेणई (तिरोडा), उत्तेजनार्थ राजदत्त चारुदत्त शेणई (तिरोडा)
(लहान गट पखवाज वादन)प्रथम क्रमांक नारायण केरकर (तिरोडा), द्वितीय क्रमांक साहिल पेडणेकर (तिरोडा), तृतीय क्रमांक राजाराम कांबळी (नाणोस), उत्तेजनार्थ पांडुरंग नाणोसकर (नाणोस)
तसेच शास्त्रीय गायक परीक्षक श्रीराम दीक्षित यांनी मानधनातील काही भाग कलाकार एकांश कोळमकर,भावेश गावकर, कौस्तुभ मुळीक (धाकोरे), अथर्व बोरकर (तिरोडा), सखाराम केरकर (तिरोडा)भूमी कांबळी
(नाणोस)आभा आसोलकर(रेडी), काव्या नाणोसकर (नाणोस), कु.दीक्षिता जाधव (नाणोस), कु.शिल्पा तळकर(नाणोस) यांना दिला.
बक्षीस वितरणावेळी व्यासपीठावर शास्त्रीय गायक व परीक्षक श्रीराम दीक्षित बाळकृष्ण शेणई,चारुदत्त शेणई, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम आडारकर,संजय गावडे, संजय तिरोडकर नवतरुण हौशी कलाकार गृप तिरोडा- भरडवाडी अध्यक्ष शंकर साटेलकर, सामाजिक कार्यकर्ते शिवराम साळगांवकर
आत्माराम साटेलकर, हर्षद केरकर, शिवराम केरकर, सामाजिक कार्यकर्ते, दिनेश मयेकर ,सचिन साटेलकर,गौरेश केरकर,राजेश पेडणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश माजगांवकर , केशव शपेडणेकर तर ध्वनी व मंडप व्यवस्था समीर आरोसकर यांनी केले.
