⚡बांदा ता.३०-: येथील शिवसेनेचे पदाधिकारी गुरु सावंत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्री. सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, बांदा शहरातूनही गुरु सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
