वन्यप्राणी प्रश्नावर टीका करणाऱ्या वक्तव्याचा ओंकार फाउंडेशनकडून निषेध…

गुणेश गवस:हत्ती प्रश्नासाठी दीर्घकालीन नियोजन गरजेचे..

बांदा/प्रतिनिधी
वन्यप्राणी व पर्यावरणप्रेमींवर टीका करणाऱ्या दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या वक्तव्याचा ओंकार फाउंडेशन, वाफोली–बांदा यांनी निषेध केला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गुणेश गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना वन्यप्राणी प्रश्न सुटत नसेल, तर अपयश कोणाचे आहे याचे श्री गवस यांनी आत्मपरीक्षण करावे.
हत्ती प्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी सुटणारा नसून दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनखात्याकडे आवश्यक मनुष्यबळ, साधने व पायाभूत सुविधा नसल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्रास जंगलतोड होत असताना कारवाई होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
ओंकार फाउंडेशन शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी प्रत्यक्ष वनखात्याशी चर्चा करत असून सुधारित दर व विविध पिकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री. गवस यांनी स्पष्ट केले. पत्रकबाजीऐवजी प्रत्यक्ष चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी गवस यांना केले. तसेच माइनिंग प्रकल्पांमुळे होणाऱ्या कधीही न भरून न येणाऱ्या शेतकरी नुकसानीची भरपाई सरकार कशी करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
फोटो:-
गुणेश गवस.

You cannot copy content of this page