मळगाव येथे राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक अमेय पै यांच्या हस्ते प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२८-:
ज्ञानदीप कला क्रीडा मंडळ, मळगाव यांच्या आयोजनाने व उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी, भाजपा नेते अमेय पै यांच्या पुरस्कृत राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात अमेय पै यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

स्पर्धेत दक्ष वेध (संघमालक – विश्वनाथ गोसावी) या संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. तर स्वामी समर्थ (संघमालक – योगेश गवंडे) या संघाने उपविजेतेपद मिळवून रोख रक्कम व चषकाचा मान पटकावला.
या प्रसंगी मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निलेश कुडव, तेजपाल सावळ, माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, भाजपा माजी जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, भाजप आंबोली मंडल युवामोर्चा सचिव भुषण बांधिवडेकर, भाजपा तालुका सरचिटणीस सिद्धेश तेंडुलकर, भाजपा मळगाव बुथ अध्यक्ष दीपक जोशी यांच्यासह प्रमोद राऊळ, प्रकाश राऊळ, रामदास राऊळ, काका देवळी, पांडुरंग राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन मळगावातील ज्येष्ठ मानकरी काका गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सिद्धेश तेंडुलकर, श्रीधर गावकर, शशिकांत राऊळ, प्रकाश राऊळ, योगेश चिंदरकर, प्रमोद राऊळ, गुरुनाथ गावकर, पंढरीनाथ गावकर आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. आयोजकांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page