आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या…

भाजप नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन: अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.२८-:
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४–२०२५ हे सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी ठीक ६.३० वाजता होणार असून, श्री. निलेश शिवाजी परब यांच्या अध्यक्षतेखाली हा सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून भाजपच्या नगरसेविका सौ. दिपाली दिलीप भालेकर यांच्या यउपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. दिलीप चंद्रकांत भालकर भाजप तालुका सरचिटणीस तसेच श्री. राजन मुळीक (माजी जिल्हा परिषद सदस्य), मा. श्री. संदीप नेमळकर (माजी पंचायत समिती उपसभापती), मा. श्री. निलेश एम. आरोलकर (दांडेली सरपंच), मा. श्री. शंकर वि. नाईक (आरोस सरपंच) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत वेशभूषा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तर सायंकाळी जलोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांचे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
या स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page