पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या दणक्यानंतर सा. बांधकाम विभागास जाग…

धोकादायक स्पॉटवर रंबलर गतिरोधक बसविण्यास सुरुवात:ग्रामस्थांनी व वाहनधारकांनी केले समाधान व्यक्त..

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे -कुडाळ- सावंतवाडी मार्गांवर मंगळवारी दि. 23 डिसेंबर रोजी मठ कुडाळतिठा येथे झालेल्या भीषण अपघातात तेंडोली येथील युवकाचा नाहक बळी गेला होता. याबाबत ग्रामस्थांच्या निवेदन व धडक आंदोलनाच्या इशारायानंतर आज शनिवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास त्वरित निर्देश दिल्यानंन्तर संबंधित धोकादायक स्पॉटवर रंबलर गतिरोधक बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मठ ग्रामस्थांनी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अपघाताच्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी मठ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी रोजी मागण्याची पूर्तता न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत मठ येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खानोलकर, भाजपाचे पदाधिकारी अजित नाईक, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर आदीनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम कुडाळ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले होते. मठ कुडाळतीठा येथे तिन्ही ठिकाणी गतिरोधक व योग्य ठिकाणी डीव्हायडर बसविण्यात यावा, अशी मागणी संबंधित ग्रामस्थ, ग्रामस्थ प्रशांत नाईक, स्वप्नील गडेकर,मठ माजी उपसरपंच निलेश नाईक, सौरभ परब,पालकरवाडी माजी सरपंच संदिप चिचकर, प्रल्हाद सोनसुरकर, समिर नाईक, संदिप तेंडोलकर, बोवलेकर आदी व अन्य ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी “रम्बलर गतिरोधक ” च्या सूचना करीत आंदोलनाचा इशारा सा. बा. अधिकाऱ्याना दिला होता. दरम्यान याबाबत ग्रामस्थ यांच्या मागणी , निवेदनानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी त्वरित ना. नितेश राणे यांच्याकडे शुक्रवारी पाठपुरावा केल्यानंतर ना. नितेश राणे यांनी त्वरित सा. बा. विभागास निर्देश दिल्यावर हे काम आज हाती घेण्यात आले. रम्बलर गतिरोधक बसविल्याने वाहधारकातून समाधान व्यक्त होत आहे. संबंधित विभागामार्फत यांची 26 जानेवारी पूर्वी पूर्तता न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे पदाधिकारी अजित नाईक व ग्रामस्थांनी दिला होता. दरम्यान
यावेळी मठ येथे सुरु असलेल्या अंडरग्राउंड विजवाहिन्या चर सुस्थितीत भरण्याबाबत वेंगुर्ला नूतन नगरसेवक प्रीतम सावंत यांनी अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून मठ ग्रामस्थांना सहकार्य केले आहे. दरम्यान कुडाळतीठा समस्याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन मनिष दळवी यांनी ग्रामस्थांना शुक्रवारी दिले होते व त्वरित आज शनिवारी हे काम हाती घेण्यात आल्याने मनिष दळवी यांच्याबाबत नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच नागरिकांचा जीव गेल्यानंतरही निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतल्याने उशिराने जाग आल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page