सुवर्णसह दोन रौप्य पदकांची कमाई ; लिशा मुणगे हायस्कूलची विद्यार्थी..
⚡देवगड ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदळे येथील लिशा दयानंद तेली हिने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे.
लिशा मुणगे हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे,
ओरस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत लिशाने आपल्या वेगवान धावण्याच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने मिळवलेले यश खालीलप्रमाणे आहे:
२०० मीटर धावणे: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
१०० मीटर धावणे: द्वितीय क्रमांक (रौप्यपदक),
लांब उडी : द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) तिने प्राप्त केले,
एकाच स्पर्धेत धावणे आणि उडी अशा दोन्ही प्रकारांत यश मिळवून लिशाने आपली क्रीडा क्षेत्रातील चमक दाखवून दिली आहे. तिच्या या यशाबद्दल सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले
या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
