बांदा येथे दोन दिवसीय आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२६-: बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणावर दोन दिवस चाललेल्या बांदा नवभारतच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात सर्वात अधिक पारितोषिके मिळवणाऱ्या बांदा खेमराज हायस्कूलला सर्वसाधारण विजेतेपद तर भेडशी हायस्कूलला उपविजेतेपद प्राप्त झाले. पुढील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले.
१४ वर्षाखालील मुलगे गटात पुढील मुलांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. १००मिटर धावणे – मंजुनाथ मसळीकट्टी, देवेश नाईक, चेतन माटणेकर. गोळा फेक – चेतन माटणेकर, सोहम गावडे, सुनील मेस्त्री थाळीफेक – सुनील मेस्त्री, वंदित गोळेकर, आर्यन शिंदे लांब उडी – मंजुनाथ मसळीकट्टी, देवेश नाईक, श्रेयस बुवा. १४ वर्षा खालील मुली – १०० मीटर धावणे – पूर्वा देसाई, धनश्री नाईक, धनश्री तळणकर गोळा फेक – हर्षदा नाईक, मानवी धूरी, सोनम चव्हाण. थाळीफेक – अलिषा गावडे ,पूर्वा साळगावकर, निधी सावंत. लांब उडी – खुशी नाईक, अलिशा गावडे, पूर्वा देसाई. सतरा वर्षाखालील मुलगे – 100 मीटर धावणे – गौरेश गवस, आयुष गावकर, रामदास गवस. गोळा फेक – मंगेश नाईक, यश गावडे, नितेश कासकर. थाळीफेक – सहदेव पाडलोसकर, नवनीत ठाकूर, कुणाल बांदेकर. भालाफेक – तुकाराम काळे, नवनीत ठाकूर, सहदेव पाडलोसकर. लांब उडी – गौरेश गवस, गोविंद सावंत, स्वामी पावसकर. १७ वर्षाखालील मुली – अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक १०० मीटर धावणे – काजल माधव, निधी सावंत, स्नेहा गवस. गोळाफेक – स्नेहा गवस, क्लेरीसा रॉड्रिक्स, पूर्वी बांदेकर, थाळीफेक – श्रुती कुडव, उर्वशी शेर्लेकर, स्नेहा गवस. भालाफेक – अक्षय देसाई, रसिका ओरसकर, वेदा गवस लांब उडी – पूर्वा जाधव, काजल माधव, समृद्धी पांढरमिसे. १९ वर्षाखालील मुलगे – १०० मीटर धावणे – किर्तेश गवस, लवू नाईक, दीपराज गवस, गोळा फेक – आयुष वालावलकर, ऋग्वेद सुतार, कन्हैया तुळसकर थाळीफेक – आयुष वालावलकर, अभीताय शेटकर, दत्तराज लोंढे भालाफेक – बाबू वरक , ऋग्वेद सुतार, दत्ताराम लोंढे. लांब उडी– किर्तेश गवस, दीपराज गवस, साहिल चव्हाण १९ वर्षे खालील मुली – प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे १०० मीटर धावणे – जान्हवी पंडित, मयुरी गवस, संगीता शेटकर. गोळाफेक – सिमरन पाटील ,संचिता महाजन, विश्रांती सुतार. थाळीफेक – वैदेही शेटकर, रेचल लोबो, विक्रांती सुतार. भालाफेक – सानिया म्हसकर, रेचल लोबो विक्रांत सुतार. लांब उडी – अलिशा कदम, समीधा दळवी, छाया केळुसकर.
सांघिक खेळांमध्ये १७ वर्षाखालील मुलगे व्हॉलीबॉल – विजयी भेडशी, उपविजय बांदा. १७ वर्षाखालील मुली हँडबॉल विजयी बांदा उपविजेता मडूरा. १९ वर्षा खालील मुली कबड्डी – विजयी कुडासे, उपविजयी बांदा. १९ वर्षाखालील मुले क्रिकेट विजयी बांदा उपविजयी भेडशी.
नेहरू वक्तृत्व स्पर्धांचे निकाल – सर्व गटातील अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे ५ वी ते ७वी गट मराठी – आस्था वेंगुर्लेकर, समृद्धी चौगुले, समृद्धी देसाई. ८वी ते १० वी मराठी निधी किडजी, सानिका गवस, तन्वी परब, ११ वी १२वी मराठी सायली गावकर, तनुजा शेर्लेकर, खुशी गवस. ८ वी ते १०वी हिंदी वेदांगी कोळापाटे, मयुरी गवस, रुची धरणे. ११ वी १२ वी हिंदी अर्बिता कुबल, ईश्वरी देसाई, दिपाली कवीटकर. ८वी ते १०वी इंग्रजी दीक्षा वरक, जुई सावंत, दूर्वा देसाई. ११वी १२ वी इंग्रजी हालीमा करोल, तन्वी ठिकार, सोनिया गवस. सर्व सांघिक खेळांच्या विजेत्या व उपविजेत्या संघाना श्री अजय तोरसकर यांनी रोख रकमेची बक्षीसे दिली.
क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ २४ डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी व्यासपीठावर बांदा नवभारतच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, कार्यकारणी सदस्या रश्मी तोरसकर, शालेय समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा समिती व समन्वय समिती सदस्य, आणि सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. क्रीडा अहवाल वाचन सूर्यकांत सांगेलकर यांनी केले तर, सूत्रसंचालन रणधीर रणसिंग यांनी केले व आभार बांदा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन जी नाईक यांनी मानले. महोत्सवाची सांगता वंदे मातरम आणि क्रीडा ध्वज कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर यांच्याकडे सुपुर्द करत झाली.

You cannot copy content of this page