निरवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे अमेय पै यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२४-: श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळ निरवडे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज उद्योजक तथा भाजपा कार्यकर्ते अमेय पै यांच्या हस्ते पार पडले. या मंडळाने सलग तिसऱ्या वर्षी या भव्य स्पर्धैचे यशस्वी आयोजन केले.

यातील विजेत्याला भाजपा चे नेमळे माजी सरपंच पुरस्कृत रु. १०००० व चषक तर उपविजेत्याला भाजपा कार्यकर्ते विक्रांत सावंत पुरस्कृत रु. ६००० व चषक तसेच तृतीय पारितोषिक रु. ३००० व चषक युवा उद्योजक तथा भाजपा कार्यकर्ते अमेय पै यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी निरवडे येथील प्रगतशील शेतकरी अमेय पै यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

You cannot copy content of this page