साक्षी वंजारी, समीर वंजारी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व समीर वंजारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवत सहकार्य राहील, असे आश्वासन साक्षी वंजारी यांनी दिले. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्षभेद न ठेवता सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

याच भेटी दरम्यान काँग्रेस पक्षाचे एकमेव नवनिर्वाचित नगरसेवक तौकीर शेख यांचाही साक्षी वंजारी व समीर वंजारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page