सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले सर्व शब्द पूर्ण करणार…

श्रद्धा सावंत भोसले:नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला..

⚡सावंतवाडी ता.२४-:
सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले सर्व शब्द उशिरा का होईना, पण नक्कीच पूर्ण करून दाखवणार आहे. शहराच्या अपेक्षांना साजेसे विकासकाम करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार, असा ठाम विश्वास नवनिर्वाचित भाजपच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे व्यक्त केला.
सावंतवाडी नगरपालिकेत आज त्यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पालिका कर्मचारी व नागरिकांकडून पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले म्हणाल्या की, सावंतवाडीकरांनी माझ्यावर ज्या विश्वासाने मत दिले, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. निवडणुकीत दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. कोणावरही टीका न करता, केवळ सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासावरच माझे लक्ष राहील. अपेक्षित कामे करून दाखवून जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, अनिल निरवडेकर, प्रतीक बांदेकर, तसेच नगरसेविका दिपाली भालेकर, विना जाधव, दुराली रांगणेकर, मोहिनी मडगावकर, नीलम नाईक, सविता टोपले यांच्यासह पदाधिकारी अँड.परिमल नाईक, दिलीप भालेकर, विनोद राऊळ, अमित परब, मनोज नाईक, केतन आजगावकर,हितेन नाईक, संकेत राऊळ, शुभम कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page