लोकांना भेटायला आता राजवाड्यातच जावे लागणार: संजू परबांचा टोला; माझी भूमिका ही आक्रमकच राहणार..
⚡सावंतवाडी ता.२२-:
सामान्य नागरिकांना आपल्या नगराध्यक्षांना भेटण्याची अपेक्षा असते. मात्र पहिल्याच दिवशी नगराध्यक्षांचा केबिन बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने संजू परब हे आक्रमक झाले.जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी आता लोकांनी थेट राजवाड्यातच जावे लागणार” असा खोचक टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आज येथे लगावला.
दरम्यान, “मी माझी भूमिका बदलणार नाही. शेवटपर्यंत जशी आहे तशीच राहणार. माझी भूमिका ही आक्रमकच राहील,” असे स्पष्ट केले.
