सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कार्याचे आमदार निलेश राणेंकडून कौतुक…

महायुतीत सकारात्मक वातावरण राखण्याचे आवाहन:तर वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून संवाद व चर्चेतून मार्ग निघू शकतो..

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे संचालक मंडळासह ‘शेतकऱ्यांची बँक’ म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

गेली अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्हा बँक राज्यात अव्वल ठरत असून अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेला राज्यस्तरीय विविध पुरस्कार मिळाले आहेत. शेतकरी, शेतीपूरक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या हितासाठी बँक कार्यरत असून जिल्ह्याच्या विकासात तिचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सध्या सर्व काही चांगल्या पद्धतीने सुरू असताना महायुतीमध्ये सकारात्मक वातावरण टिकून राहणे गरजेचे आहे. वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून संवाद व चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्यामुळे अनावश्यक टीका टाळण्याचे आवाहनही आमदार निलेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page