⚡बांदा ता.१५-: वाफोली येथील शेतकरी कुटुंबातील भावेश भगवान गवस याने किक बॉक्सिंगमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १९ वर्षांखालील ७० किलो वजनी गटात भावेशने कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून गावाचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे.
भावेश सध्या खेमराज हायस्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. या यशासाठी त्याला खेमराज हायस्कूलच्या सुमेधा सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विलवडे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री बांदेकर, अमित पालव, रोहन पाटील आणि ऋतिक सावंत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या यशाबद्दल वाफोली सरपंच उमेश शिरोडकर आणि उपसरपंच विनेश गवस यांनी भावेशच्या घरी जाऊन त्याचे तसेच त्याच्या आई-वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भावेशचे वडील भगवान गवस, आई भक्ती गवस, निवृत्त शिक्षक मनोहर गवस, भिवा गवस, तृषाल गवस, ओंकार गवस, सदानंद गवस आणि जयेश गवस आदी उपस्थित होते.
फोटो:-
वाफोली येथे भावेश गवस याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना उपसरपंच विनेश गवस व इतर.
वाफोलीचा भावेश गवस किक बॉक्सिंगमध्ये राज्यात उपविजेता…
