मळेवाड येथे २० डिसेंबर रोजी भजन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड हेदुलवाडी येथे भजन प्रेमी मित्र मंडळ मळेवाड यांनी मळेवाड – कोंडुरे गाव मर्यादित भव्य भजन स्पर्धेचे शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी आयोजन केले आहे.

सदरील स्पर्धेसाठी भरघोस अशी पारितोषिक देण्यात येणार असून,यात प्रथम विजेत्या भजनी मंडळाला रु.५०००/-(प्रकाश पार्सेकर पुरस्कृत)द्वितीय रु.३०००/-(सदाशिव आईर) तर तृतीय रु .२०००/- ( सुदीप गावडे पुरस्कृत) तसेच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट चकवा, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट तबला यांसाठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.
भजन स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक व सन्मानचिन्ह हे माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी पुरस्कृत केले आहेत.
या स्पर्धेतील भजनी मंडळ पुढीलप्रमाणे – श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ,कुंभारवाडी (बुवा – गणेश कुंभार), आई भवानी प्रासादिक भजन मंडळ, मळेवाड (बुवा – नंदकिशोर काळोजी)विश्वकर्मा प्रा.भजन मंडळ,वरची मळेवाड,(बुवा – ओंकार मेस्त्री) स्वरनाद काळोबा प्रासादिक भजन मंडळ, मळेवाड ( निवृत्ती चराटकर) ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ,भटवाडी( बुवा – रोहन रेडकर),श्री देव म्हापसेकर प्रासादिक भजन मंडळ , वरचीमळेवाड,(बुवा – निलेश मुळीक) मुसळेश्वर प्रासादिक भजन मंडळ मळेवाड हेदुलवाडी(बुवा – मितेश नाईक) या भजनी मंडळांचा समावेश असून,सदरील भजन स्पर्धेला सर्व भजन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन भजन प्रेमी मित्र मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page