⚡मालवण ता.१४-: माळगाव श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. मंगळवार, १६ रोजी श्री देव रवळनाथ मंदिरात ओट्या भरणे, गाऱ्हाणे, नवस बोलणे व फेडणे, रात्री देव तरंगासह सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
बुधवार, १७ रोजी श्री देव रवळनाथ पंचायतन देवतरंगांसहबागायत येथील ब्राह्मणदेवाच्या भेटीला येणार असून ब्राह्मण देवालय येथे वस्तीस्थानी राहणार आहेत. गुरुवार, १८ रोजी बागायत ब्राह्मण देवालय येथे दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी ओट्या भरणे, आदी कार्यक्रमानंतर श्री देव रवळनाथ पंचायतन, माळगाव येथील मंदिरात गेल्यावर तीन दिवसांच्या वार्षिक जत्रोत्सवाची विधिवत सांगता होणार आहे. भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माळगाव ग्रामस्थांच्यावतीने देवस्थान प्रमुख बबन सरनाईक यांनी केले आहे.
