श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन..
सावंतवाडी : सावंतवाडी तालुकास्तरीय द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेचे येथील श्रीराम वाचन मंदिरच्यावतीने बुधवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते कै. दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रकमेच्या व्याजातून दरवर्षी पू. सानेगुरुजी जयंतीनिमित्त (२४ डिसेंबर) शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे ३० वे वर्ष आहे.
ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
पहिला गट : इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक – रु. २५०/-,
द्वितीय क्रमांक – रु. २००/-,
तृतीय क्रमांक – रु. १५०/-
दुसरा गट : इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक – रु. ३००/-,
द्वितीय क्रमांक – रु. २५०/-,
तृतीय क्रमांक – रु. २००/-
अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असून जिल्हा परिषद शाळांनाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा आटोपल्यानंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटात जास्तीत जास्त दोन स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीपर्यंत स्वीकारली जातील. स्पर्धेत जास्तीत जास्त शाळेतील स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभागी, असे आवाहन कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह बोंद्रे यांनी केले आहे.
