नागरिकांचा प्रवास सुरक्षित:देव्या सूर्याजी यांनी मानले प्रशासनाचे आभार..
⚡सावंतवाडी, ता. १४ :
शहरातील मोक्याच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी येथील शाळा क्रमांक २ च्या बाजूला चार नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास आज सुरुवात झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळा नं. २ च्या बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी व धोका निर्माण होत होता. या गंभीर समस्येकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी नगरपालिका प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.
या निवेदनाची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत आजपासून स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात केली. सध्या या ठिकाणी चार नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरू असून त्यामुळे परिसरातील सुरक्षितता वाढणार आहे.या कामासाठी नगरपालिका विद्युत विभागाचे कर्मचारी श्री. प्रदीप सावरवाडकर, श्री. दीपक म्हापसेकर तसेच कंत्राटदार श्री. विजय सावंत यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल देव्या सूर्याजी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
