सासोली येथे घरफोडी;दागिने,रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला…

⚡दोडामार्ग, ता.१४-:
सासोली – वाघमळा येथे अज्ञात चोरट्यांनी गणपत संभाजी देसाई यांचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.चोरट्यांनी शनिवार, दि.१३ डिसेंबर रोजी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरी केली.याबाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून नेमकी माहिती पोलिसांकडून काही वेळाने देण्यात येणार आहे.चोरट्यांनी घरात घुसून आतील खोल्यातील लोखंडे कपाट फोडून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले.
गेल्या काही दिवसांत घरफोडी,दुकानफोडी यासारखे प्रकार तालुक्यात घडतात.मात्र,पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे.

You cannot copy content of this page