८ वर्षांच्या पुर्वांक कोचरेकरची राष्ट्रीय बुद्धिबळात चमकदार कामगिरी…

आंतरराष्ट्रीय रेटेड ५ खेळाडूंवर मात करत पुर्वांकने वेधले लक्ष:विशाल परब यांच्याकडून शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.१४-: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी लोकमत महा गेम्स अंतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत पुर्वांक कोचरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला होता. या यशानंतर राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावला आहे.

पुर्वांकच्या या दैदीप्यमान यशाबद्दल भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य मा. श्री. विशाल परब यांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना विशाल परब म्हणाले, “इतक्या कमी वयात राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. पुर्वांकचा हा प्रवास अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा असून, भविष्यात तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी मला पूर्ण खात्री आहे.”

पुर्वांक कोचरेकर यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील क्रीडाप्रेमी, शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page