शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता या जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शाळेने एकूण ४ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

शरण्या सुनील राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण पदक

श्लोक गजानन राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण पदक

रुची सच्चीदानंद मेस्त्री (इयत्ता चौथी) – सुवर्ण पदक

दुर्वा महेश पवार (इयत्ता तिसरी) – सुवर्ण पदक

धनश्री सुधीर राऊळ (इयत्ता दुसरी) – रौप्य पदक

अर्णवी संतोष निरवडेकर (इयत्ता चौथी) – रौप्य पदक

भूमी लक्ष्मण राणे (इयत्ता चौथी) – रौप्य पदक

असे उल्लेखनीय यश विद्यार्थ्यांनी मिळविले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, शाळेच्या शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page