मळेवाड येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या विभागाचा भ्रमणध्वनी गेले कित्येक दिवस बंदावस्थेत:तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी दुरुस्त कधी होणार..?
⚡सावंतवाडी ता.१३-: मळेवाड जकात नाका येथील केंद्र शाळा नं.१ नजीक विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने त्या रस्त्यावर तुटून पडल्या . मात्र सदरील तारा ह्या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने तेथे एखादा अपघात घडण्याची शक्यता वाढली असून,सदरील घटना येथील ग्रामस्थांनी पाहिल्यावर लागलीच मळेवाड विद्युत पुरवठा उपकेंद्राकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र गेले कित्येक दिवस बंदावस्थेत असलेला भ्रमणध्वनी लागत नसल्याने ग्रामस्थात नाराजीचा सूर आहे.
एखादी घटना घडल्यास संपर्क करायचा कोणाकडे?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मात्र संबंधित विभागाशी संपर्क होत नसल्याने स्थानिकांनी विद्युत पुरवठा केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली.मात्र तेथे गेल्यावर निदर्शनास आले की गेले कित्येक दिवस येथील तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी बंदावस्थेत पडून आहे.त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आहे..त्यामुळे लागलीच संबंधित विभागाने दखल घेऊन पडलेल्या तारा तत्काळ बाजूला करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
