हत्ती पकड मोहीम राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी..
⚡दोडामार्ग, ता.१३-: घाटीवडे परिसरात आलेल्या गणेश व छोट्या मादीने सत्यवान गवस या शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गेली अनेकवर्षे गवस यांच्या शेती बागायतीची नासधूस सुरू असल्याने सरकारने हत्ती पकड मोहीम राबवावी आणि शेतकऱ्यांना निर्भयपणे जगू द्यावे, अशी मागणी दत्ताराम देसाई यांनी केली आहे.
घाटीवडे–बांबर्डे परिसरात हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन्ही हत्तींनी सत्यवान गवस यांच्या शेतात घुसून केळी, सुपारी तसेच नारळाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.असेच रोज नुकसान होत राहिले, तर आम्ही जगायचे कसे,असा प्रश्न शेतकरी विचारत असून आम्हाला तुटपुंजी भरपाई नको; वन विभागाने तत्काळ हत्तीं पकड मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
