१३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई:रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन..
सावंतवाडी : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. स्पर्धेत एकूण शाळेने तब्बल १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळून २३ पदकांची कमाई केली आहे
या स्पर्धेत इयत्ता चौथीतील रूची सच्चिदानंद मेस्त्री हिने स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला असून तिने गॅलॅक्सी प्रोजेक्टर भेटवस्तू, चषक व सुवर्ण पदक तर इयत्ता दुसरीतील आर्वी राजेश तेली हिला मेरिट ट्रॉफीसह सुवर्ण पदका पटकाविले आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही अत्युत्कृष्ट कौशल्य सादर करत सुवर्ण पदकांची लयलूट केली.
सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी
मानसी लक्ष्मण म्हाडेश्वर (४ थी), भूमी लक्ष्मण राणे (४ थी), चार्वी रघुनाथ वारंग (३ री), ओवी रुपेश गवंडे (३ री), आशुतोष शिवराम तारळकर (३ री), क्रांती नेमराम देवासी (३ री), ध्रुव रघुनाथ हरमलकर (४ थी), गार्गी एकनाथ गावडे (२ री), ज्योती धर्मेंद्र राजपूत (३ री), जयेश जानू कोळेकर (४ थी), गौरांग पंढरीनाथ गावकर (३ री).
रौप्य पदक विजेते विद्यार्थी
काव्या अर्जुन राऊळ (४ थी), शरण्या सुनील राऊळ (२ री), श्रावण्या शंभा राऊळ (४ थी), स्वानंदी लक्ष्मण कुडव (१ ली), तन्मय सिद्धेश तेंडोलकर (२ री).
कांस्य पदक विजेते विद्यार्थी
अर्णवी संतोष निरवडेकर (४ थी), दक्ष सुजित धुरी (१ ली), राजवीर अभिजित गोसावी (१ ली), माही सत्यप्रकाश हरमलकर (३ री), मुग्धा महेश राऊळ (१ ली).
स्पर्धेत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळवल्यामुळे ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ संस्थेकडून शाळेला ‘उत्कृष्ट शाळा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच शाळेचा मानाने गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक तथा खो-खो नॅशनल चॅम्पियान म्हैसकर सर व सौ. मेघा नाटेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, शाळेच्या शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भक्कम कामगिरीमुळे शारदा विद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे व जिल्ह्याचे नाव आणखी उज्ज्वल केले आहे.
