⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
मंगळवार ९ डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. यात कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले.
प्राप्त क्रमांक पुढीलप्रमाणे :
लहान गट – १०० मीटर धावणे :
तृतीय क्रमांक – ओंकार धारगळकर
मोठा गट – मुली रिले शर्यत :
प्रथम क्रमांक
मोठा गट – २०० मीटर धावणे :
प्रथम क्रमांक – भूमी नाईक
द्वितीय क्रमांक – प्रांजल कुंभार
मोठा गट – मुली १०० मीटर धावणे :
प्रथम क्रमांक – शुभेच्छा गावकर
गोळाफेक :
तृतीय क्रमांक – परी पेडणेकर
मोठा गट – मुली कबड्डी :
विजेता संघ
या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
