⚡मालवण ता.१२-:
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मालवण शहरातील समाजसेवी व्यक्तीमत्व तसेच जेष्ठ डाॅ.सुभाष मधुकर दिघे यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- सुधीर धुरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.
डॉ. दिघे यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1969 – 1971आचरा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर 1976 पासून मालवण मध्ये वैद्यकीय व्यवसायाला सुरूवात केली. गरजू रुग्णांसाठी रात्री अपरात्री वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देऊन असंख्य रुग्णांना जीवदान दिले आहे. त्याचबरोबर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रत्नागिरी विभाग संघचालक तसेच कोकण प्रांत सेवा प्रमुख म्हणून काम केले आहे. मालवण येथील शिवाजी वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहिली. मालवण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच माणगाव येथील डाॅ. हेडगेवार प्रकल्प या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली आहे. आनंद वृद्धाश्रम अणाव येथे मार्गदर्शक म्हणून सेवा देत होते.
डॉक्टर दिघे यांच्या चतुरस्त्र प्रदिर्घ कामगिरीची दखल घेऊन ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मालवण शहरातील जेष्ठ डाॅ.सुभाष मधुकर दिघे यांचा संघटनेच्या वतीने कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- सुधीर धुरी, मालवण तालुकाध्यक्ष- प्रमोद कांडरकर, मालवण तालुका उपाध्यक्ष महेश मयेकर, उपाध्यक्ष- संग्राम सिंह पवार, निरीक्षक- संदेश फाटक, महिला संघटक- मुक्ता रजपूत, श्री.ढोलम आदी उपस्थित होते.
