इन्सुली घाटीतील घटना , चालक व क्लिनर किरकोळ जखमी
*💫सावंतवाडी दि.१२-:* इन्सुली घाटात पुणे ते गोवा औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला,आज रात्री ९.३० सुमारास औषधांची वाहतूक करणारा ट्रक इन्सुली घाटात मुख्य वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला, सुदैवाने ट्रकमधील चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी होऊन बचावले मात्र औषधांचे आणि ट्रकचे नुकसान झाले
