कर्मचाऱ्यांच्या मागणीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मुदतवाढ_
*💫सावंतवाडी दि.१२-:* उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांचा कार्यभार संपत असल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करत डॉ. उत्तम पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिली. डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स, परिचारिका,कर्मचारी हे सगळेच उत्तम कामगिरी करत आले आहेत. त्यांना कोरोना सारख्या कठीण काळात मुदतवाढ देण्यात यावी”या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हिरवा कंदील दाखवत मागणी मान्य केली. यावेळी डॉ.पाटील करत असलेल्या ‘उत्तम’ कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी एसपी श्री. राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी श्री.सुशांत खांडेकर, डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर,माजी सभापती श्री.मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी उपस्थित होते.
